Type Here to Get Search Results !

सोलापूर | आमच्या चौकात रामनवमी साजरी करावयाची नाही व झेंडे लावायचे नाहीत असे म्हणत एकास मारहाण



सोलापूर | आमच्या चौकात रामनवमी साजरी करावयाची नाही व झेंडे लावायचे नाहीत असे म्हणत एकास मारहाण


फिर्यादी अर्जुन राम मोहिते (वय वर्षे 25), रा. वैद्यवाडी, भवानी पेठ, सोलापूर यांनी जोडभावी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 25 मार्च रोजी सायंकाळी 7: 30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील प्रियंका चौक येथे फिर्यादी मित्रांसमवेत गप्पा मारीत उभे असताना रफिक बाशा जातकर याने फिर्यादीला बाजूला बोलावून घेतले. त्याचवेळी निजाम जातकर यांने फिर्यादीला, तू रामनवमीचे प्रियंका चौकात झेंडे लावायचे नाहीत. तसेच आमच्या चौकात रामनवमी साजरी करावयाची नाही, असे म्हणून निजाम जातकर याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या कानाच्या पाठीमागे मारल्याने मुक्कामार लागून त्यात गाठ आली आहे. तसेच आरोपी सलीम मौलाली शेख, बंदेनवाज मौलाली शेख, अमिन शेख, रियाज जातकर, मौलाली हुसेन जातकर, मौला इमाम जातकर या सर्वांनी फिर्यादीला, तू आमच्या चौकात रामनवमी साजरी करु नको व झेंडे लावू नको, असे म्हणत हाताने, लाथा-बुक्क्याने मारहाण केली. म्हणून या सर्व आरोपीं विरुध्द जोडभावी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पीएसआय व्हट्टे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad