Type Here to Get Search Results !

नुकसानग्रस्त भागाची केली विद्यमान आमदार ससाणे यांनी पाहणी. (शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा).



नुकसानग्रस्त भागाची केली विद्यमान आमदार ससाणे यांनी पाहणी. (शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा).


ढाणकी प्रतिनिधी दिगांबर शिरडकर.


  काल अचानक झालेल्या वादळी वारे व गारपेटि सह उमरखेड तालुक्यातील सर्वच भागामध्ये झोडपून काढले. त्यात शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेले पीक अक्षरशः नष्ट झाले. शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामावर रंगवलेले स्वप्न क्षणात चकना चुर झाले.गहू,हरभरा,तीळ,टरबूज, आज रोजी काढाय आलेले होते.आता शेतकरी थेट सर्व माल काढणार व मार्केट ला नेणार यातच होत्याचे नव्हते झाले.डोलू लागणारे पीक अवकाळीने जमिनीवर लोळू लागले.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. त्यासाठी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता विद्यमान आमदार नामदेवराव ससाने यांनी गांजेगाव व आकोली या भागाची थेट शेतात जाऊन पाहणी केली. तुटपुंजी मदत न करता नुकसानग्रस्त भागास प्रामुख्याने योग्य ती मदत मिळून देण्याचे शेतकऱ्यास आश्वासन दिले . यावेळी शेतकऱ्यास उभ्या डोळ्या देखत नष्ट झालेल्या पिकांचे पाहण्या खेरीज काहीही करता आले नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते.




शेतकऱ्यांनी आमदारापुढे आपल्या व्यथा मांडल्या आमदार ससाने यांनी शेतकऱ्यास धीर देत नुकसानग्रस्त भागाची योग्य ती मदत देण्याची ग्वाही देत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी गावातील शेतकरी संजय दिवसे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.आमदार ससाने यांच्यासह दत्त दिगंबर वानखेडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, उमरखेडचे तहसीलदार देऊळगावकर, मंडळ अधिकारी सचिन फटाले यांसह प्रशासनातील काही अधिकारी वर्ग सुद्धा उपस्थित होता.

आमदाराच्या या भेटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, लवकरच नुकसान भरपाई मिळणार याची आशा लागली असून, थोडे का होईना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad