Type Here to Get Search Results !

सोलापूर | देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा दहन केल्या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल



सोलापूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा दहन केल्या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल 


सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी 10 जणांवर बुधवारी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोलापुरातील भीम आर्मी संघटनेच्या वतीने आंदोलन करत 21 मार्च रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला होता. याप्रकरणी बेकायदेशीरपणे जमाव जमवून सार्वजनिक ठिकाणी हे हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुटकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीम आर्मी संघटनेचे शहर अध्यक्ष अजय मैंदर्गीकर, मिलिंद प्रक्षाळे, सौरभ कांबळे यांच्यासह इतर सात जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बेंबडे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad