Type Here to Get Search Results !

शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी



शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात; एक ठार, एक जखमी


 पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.


सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील सरकारी पोलिस गाडीचा आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला व एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नाझरे गावाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.


 सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाड्यांचा ताफा नाझरे गावामधून सांगोल्याकडे जात असताना नाझरे गावच्या जिल्हा मार्गावरील अंतर्गत रोडवर आमदार शहाजी पाटील यांच्या ताफ्यामधील सरकारी पोलीस स्कार्पिओ गाडी क्रमांक MH 13 DM 1940 आणि मोटारसायकल क्रमांक MH 45 AG 6330 या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला.


या अपघातात मोटारसायकलस्वार अशोक नाना वाघमारे (वय 50, रा. माडगुळे. ता. आटपाडी, जि. सांगली) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने हे (रा. एकतपूर, ता. सांगोला) गंभीर जखमी झाले.


 अपघाताचे वृत्त समजताच महामार्गाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad