Type Here to Get Search Results !

बालकांच्या आरोग्याच्या काळजी हिच मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा श्री प्रदीप वाघ



बालकांच्या आरोग्याच्या काळजी हिच मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा श्री प्रदीप वाघ


आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी बालकांना पोष्टीक आहार वाटप करण्यात आला यावेळी बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की बालकांचे आरोग्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, तालुक्यातील कुपोषणचा कंलक मिटविण्यासाठी देखील आपण प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन देखील श्री प्रदीप वाघ यांनी केले.

सायदे वाघ्याची वाडी येथील अंगणवाडी केंद्रातील बालके,माता,व महिलांना पोष्टीक आहार वाटप करुन, मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच तालुका प्रमुख श्री अमोल पाटील यांनी देखील मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य सौ.आशा झुगरे, सरपंच गीता पाटील, सरपंच,लता वारे, सरपंच गौरी बोटे, नरेंद्र येले, उपसरपंच श्री नंदकुमार वाघ, गणेश खादे, संजय वाघ, दशरथ पाटील,भारत बुधर,जगन झुगरे, नरेंद्र वाघ, अशोक वाघ,अक्षय कोरडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक एंरडे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक श्री निलेश झुगरे ग्रामपंचायत सदस्य यांनी केले तर आभार प्रशासक श्री गोडे यांनी केले यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस,, ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.* मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad