मा. नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
जव्हार - दिनेश आंबेकर .
जव्हार - जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत झाप हद्दीतील बी. बी. एस. आय. एस. इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल झाप ही शाळा येत असून या शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.
तसेच आज या ठिकाणी मा. नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले मुख्य तर स्वच्छ ता अभियान ही संकल्पना राबवण्यात आली तसेच डे सेलिब्रेशन, येलो डे सेलिब्रेशन, हस्ताक्षर स्पर्धा, स्टोरी टेलिंग कंपेटिशन असे उपक्रम राबविले असून तेथील शिक्षक हे नेहमीच कार्यक्षम असतात.
हे उपक्रम राबवत असताना येथील शिक्षक उपस्थित होते श्री. दीपक खांजोडे सर, श्री. मनोज वारा सर, श्री. देवा गवारी सर,
श्रीम.विजया वातास मॅडम श्रीम. मंजुळा मॅडम, यांनी त्यांच्या शाळेतील झाप विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आणि मा. नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपक्रम राबविले.