Type Here to Get Search Results !

सुरेश (बाळ्या मामा ) गोपीनाथ म्हात्रे यांनी श्रीराम गोशाळेला भेट देऊन गोसेवेसाठी ५९ हजाराचा धनादेश सुपूर्द केला.



सुरेश (बाळ्या मामा ) गोपीनाथ म्हात्रे यांनी श्रीराम गोशाळेला भेट देऊन गोसेवेसाठी ५९ हजाराचा धनादेश सुपूर्द केला.


 प्रतिनिधी :- सुनिल जाबर


 दि.०९ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना ठाणे जिल्हाचे संपर्क प्रमुख श्री. सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे साहेब यांनी आज वाडा तालुक्यातील धापड तेथील श्रीराम गोशाळेला भेट देऊन गोसेवेसाठी धनादेश सुपूर्द केला. यावेळी त्यांचा गोशाळेचे मालक श्री.किशोर कराळे यांनी त्यांचा सत्कार केला.

        यावेळी श्री.शरद पाटील, श्री.सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.मिताली मिलिंद बागुल, वाडा उपनगराध्यक्ष श्री.संदीप गणोरे, पंचायत समिती सदस्य श्री.योगेश गवा, श्री.सागर ठाकरे, श्री.अमोल पाटील, राजू पाटील, गिरीश डेंगाने, सत्यवान भोईर, चेतन पाटील, आशिष पाटील, धनेश साने, श्री.मिलिंद बागुल तसेच वाडा व भिवंडी तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad