Type Here to Get Search Results !

संत गरिब दास जी महाराज बोध दिवसानिमित्त शहादा येथे भव्य शोभायात्रा



संत गरिब दास जी महाराज बोध दिवसानिमित्त शहादा येथे भव्य शोभायात्रा


 शहादा येथे संत गरीबदास जी महाराज यांच्या बोध दिवसानिमित्त संत रामपाल जी महाराज यांच्या अनुयायांकडून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले.




           नंदुरबार जिल्ह्यामध्ये संत रामपाल जी महाराज यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर असल्याने संत रामपाल जी महाराज यांच्या आश्रमातून जो आदेश निघतो तो आदेश सर्व अनुयायांना बंधनकारक असतो त्या पार्श्वभूमीवर भव्य रॅलीचे आयोजन करण्याचा आदेश प्राप्त झाला होता जेणे करून समाजाला गरीबदास जी महाराज यांच्या बोध दिवसाची माहिती व्हावी त्या अनुषंगाने आज रोजी शहादा येथे संत गरीबदास जी महाराज यांच्या बोध दिवसानिमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले.




या शोभा यात्रेला जिल्हाभरातील कानाकोपऱ्यातून संत रामपाल जी महाराज यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर हजर होते.सर्वप्रथम काथरदा खुर्द या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता प्रोजेक्टरच्या माध्यमातून सत्संगाचे आयोजन करण्यात आले .




त्या ठिकाणाहून सत्संग आटोपल्यानंतर लागली सर्व अनुयायी शहादा येथे शोभा यात्रेसाठी उपस्थित झाले व शोभायात्रा ही महात्मा फुले चौकातून ठीक दुपारी २ वाजता निघाली यावेळी शोभायात्रेमध्ये हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली. या उपस्थितीमध्ये अनुयायांनी दाखवलेले शिस्तीचे पालन हे या शोभा यात्रेचे मोठे वैशिष्ट्य होते.




     कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं.परंतु संत रामपाल जी महाराज यांचे अनुयायी हे शिस्तबद्धरित्या आपलं कार्य पुढे नेत असतात याची प्रचिती आज देखील आली. अगदी शिस्तबद्ध रित्या आणि सेवेदरांच्या उपस्थितीत शोभा यात्रा मुख्य बाजारपेठेतून निघून परत महात्मा फुले चौकापर्यंत येऊन तिची सांगता करण्यात आली.




     या शोभा यात्रेमध्ये संत रामपाल जी महाराज यांचे अनेक उद्देश या ठिकाणी भक्तांच्या वतीने जनसमुदायासाठी खुले करण्यात आले .त्यामध्ये विश्वाला सतभक्ती देऊन मोक्ष प्रदान करणे., समाजातून जातीपाती भेद मिटविणे., तरुणांमध्ये नैतिक व अध्यात्मिक जागृती करणे., समाजाला सर्व प्रकारच्या नशेतून मुक्त करणे., समाजामध्ये रुजू झालेल्या हुंडा रुपी कुरितीला या ठिकाणी मुळासकट संपविणे., समाजामध्ये शांती व बंधुता स्थापित करणे., समाजातील वाईट गोष्टींना लगाम घालून स्वच्छ समाज निर्माण करणे., भ्रष्टाचाराला मुळातून संपविणे., असे मुख्य उद्देश रामपाल जी महाराज यांचे आहेत हे या ठिकाणी सर्व जगाला समजावण्यात आले.यावेळी यात्रा मुख्य बाजार पेठेतून जात असताना.कबीर साहेबांच्या घोषणांनी अवघे शहादा शहर दुमदुमून निघाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies