Type Here to Get Search Results !

७/१२ ची कथा शेतकऱ्याच्या माथी व्यथा एका सातबाराचे दोन उतारे फेरफारात शेतकऱ्याची जागा गायब



७/१२ ची कथा शेतकऱ्याच्या माथी व्यथा एका सातबाराचे दोन उतारे फेरफारात शेतकऱ्याची जागा गायब

 

ज्याच्या नाही ललाटी त्याच्या लावी तलाठी 


मुरबाड दि २७ प्रतिनिधी लक्ष्मण पवार 


शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकरी जरी कशीत असले तरी त्या जमिनीचे दस्तावेज मात्र तलाठी नामे महसुली साहेबांच्या हातात असतात त्याने ठरविले तर ज्याच्या ललाठी नाही त्याच्या ही ललाठी लावण्याची किमया करू शकतो आणी ह्या किमया करण्यात मुरबाड महसुलाचा काहीचा हातखंडा आहे ,या तलाठीच्या छोट्याशा नजरचुकीची धसई गावातील एक शेतकरी भोगित आहे , 




धसई तलाठी यांच्या अहवाला नुसार धसई येथील ५६/१ आकारबंद प्रमाणे ० ६० पो,ख, ८,८७पैकी फेरफार क्र १२३१ प्रमाणे ३० गुंठे एवढी जागा एकाचे नावे व ७/१२ दोन उतारे झाले आहेत पैकी ३० आर क्षेत्र टिळक रघूनाथ घोलप यांना खरेदीखत क्र ३१३८ /२०२१ दि १०/१२/२१केले आहे परंतु हि ३० गुंठे जागा विकत घेतली असता खरेदीखत व जागेचे रजिस्टर ही झाले मा़त्र फेरफार करतांना जागा गायब असल्याचा अनुभव टिळक घोलपांना आला,या एकाच जागेचे दोन उतारे बनविले गेल्याने पहिली विक्री झाली परंतु विक्रेत्या शेतक-याला दुसरा उतारा देण्यात आला व त्यावर ३० गुंठेजागा नोंद आहे मात्र जागाच उपलब्ध नसल्याने या जागेच्या किमंत ती रजिस्ट शासकिय रक्कम भलेली अशी किमान ६ लाख ७२ हजाराचा भूदंड घेणा-यांला बसला व हि बाब तहसिलदारांच्या निदर्शनास आणताच त्यांनी या बाबत न्यायालयात अपिल करण्याचे आदेश दिल्याने तेल गेल तुप हि गेल हाती धुपाटण आल्या सारखी परिस्थिती या जमिन खरेदी करणा-या शेतक-यांची झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies