Type Here to Get Search Results !

तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीचे विधिवत येथील बारगळ वंशजांकडून पूजन



तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीचे विधिवत येथील बारगळ वंशजांकडून पूजन


गड, किल्ले दिनाच्या पार्श्वभूमीवर तळोदा येथील ऐतिहासिक बारगळ गढीचे विधिवत येथील बारगळ वंशजांकडून पूजन करण्यात आले.




तळोदा येथील बारगळ गढ़ी भोजराज बारगळ यांनी बांधली होती. सहा एकर क्षेत्रावर या गढीचा विस्तार आहे. जवळपास पावणे चारशे वर्षांची परंपरा या गढीला लाभली आहे. गढीची पूजा तिचे वंशज दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी करतात. मात्र मागील तीन-चार वर्षांपासून गड किल्ले दिनाच्या दिवशीही आपल्या गढीची पूजा करावी, अशी सूचना पुणे येथील वतनदारांनी जहागीरदार अमरराजे बारगळ यांना केली.




त्यानुसार रविवारी गढीच्या प्रवेशद्वाराचे बारगळचे जहागिरदार अमरजित बारगळ, धनंजय बारगळ, बारगळ, मनिषादेवी धनंजय बारगळ, नम्रताताई होळकर यांच्या हस्ते मंत्रोच्चारात विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी डॉ देविदास शेंडे, जगदीश माळी, रत्नाबाई माळी आदी सह नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad