Type Here to Get Search Results !

गोपाळ हमरे गुरुजी यांनी केल 38 वर्षे ज्ञान दानाचे कार्य - श्री प्रदीप वाघ



गोपाळ हमरे गुरुजी यांनी केल 38 वर्षे ज्ञान दानाचे कार्य - श्री प्रदीप वाघ

मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी 

मोखाडा - गुरु विना खूप काही अधुरे राहते आहे, असे म्हणायला वावगे जाणार नाही. कारण आपण अनेक गोष्टी पासून काही ना काही शिकत असतो कधी काही वस्तू पासून कधी काही व्यक्ती पासून आणि मुख्य म्हणजे आपण शाळेत जाऊन आणि मोलाचे शिक्षण घेत असतो ते म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान घेत असताना आपल्याला मुख्य म्हणजे मार्गदर्शन देऊन आणि शिक्षण, ज्ञान लाभते ते म्हणजे शिक्षकांकडून हे शिक्षण देऊन आणि आपल्याला काही शिक्षकांचे, गुरूनांचे सेवापूर्ती चे निरोप समारंभ होत असतात.     

असेच श्री गोपाळ यशवंत हमरे गुरुजी यांच्या सेवापुर्ती निमित्ताने चास येथील चिकनपाडा जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की 38 वर्षा पूर्वी शिक्षक पेक्षा स्विकारलेले गोपाळ हमरे यांनी अगदी कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी 38 वर्षे ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले आहे, आदिवासी समाजातील अशा गुरुजींच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे हि श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले.

श्री भरत गारे गुरुजी यांनी गोपाळ हमरे यांच्या जीवनावर सुंदर गीत सादर केले यावेळी सर्व भावुक झाले गोपाळ हमरे यांच्या आईचे डोळे पाणावले होते.

या कार्यक्रमा साठी श्री महाले विस्तार अधिकारी, श्री हेमंत लहामगे ठाणे पतपेढी अध्यक्ष, श्री संजय वाघ माजी सरपंच, श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य, श्री इश्वर पाटील सर, केंद्र प्रमुख, सर्व शिक्षक,चास गावातील सर्व प्रतिष्ठान ग्रामस्थ, श्री गोपाळ हमरे गुरुजी यांचे आई वडील व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad