Type Here to Get Search Results !

कामोठे पनवेल येथे विभागीय स्पर्धेत वावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा घवघवीत यश



कामोठे पनवेल येथे विभागीय स्पर्धेत वावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा घवघवीत यश


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर


    रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड विभाग अंतर्गत कामोठे पनवेल येथे तीन दिवसीय विविध क्रीडा प्रकार आयोजन केलेले होते .यात आश्रमशाळा वावर मधील मुला मुलींनी घवघवीत यश मिळवले आहे.

     खो खो मुले १४ वर्ष वयोगटातील प्रथम विजयी ठरल्या त्यांनतर खो खो मुली १४ वर्ष वयोगटातील प्रथम विजयी तसेच कबड्डी मुली १७ वर्ष वयोगटातील प्रथम विजयी झाले आहेत अतिशय आश्रम शाळा वावर ही निसर्गाच्या सानिध्यात वसलेली असून ती अतिदुर्गम भागात असून येथील विद्यार्थी पुढे जावून घवघवीत यश मिळवत आहेत हे समोर दिसून आले आहे.क्रीडा शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी या मध्ये मुलांना मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणात घवघवीत अजिंक्य आणले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad