बालवीर चौकात सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
नंदुरबार (प्रतिनिधी)। शहरातील बालवीर चौक परिसरात नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा देखील शुभारंभ करण्यात आला.
शहरातील बालवीर चौक परिसरात असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरालगतच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन नगराध्यक्षा रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेविका भारती राजपूत, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक संजय मक्कन चौधरी, पत्रकार हिरालाल चौधरी, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,संजय भदाणे, मोहितसिंग राजपूत,आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महादू हिरणवाळे यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन सुदाम हिरणवाळे, अनिल कुंभार, लखन माळी, दिलीप कुंभार, सदाशिव गवळी, काशिनाथ गवळी,ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह बालवीर चौक परिसरातील नागरिकांनी केले.या कार्यक्रमास पिंपळेश्वर हनुमान व महादेव मंदिर परिसरातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.