Type Here to Get Search Results !

वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डने IPL मधून निवृत्ती जाहीर




 मुंबई: वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डने IPL मधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

 IPL 2023 साठी खेळाडूंच्या रिटेंशनआधी ही बातमी आली आहे. कायरन पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आहे. त्याने आपल्या बळावर मुंबई इंडियन्सला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलेत. मागच्या सीजनमध्येच पोलार्ड IPL मध्ये खेळणार नसल्याचे संकेत मिळाले होते. आता निवृत्तीनंतर तो आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार नाहीय.



पोलार्डचा नवीन रोल कुठला?

पोलार्ड आयपीएलमध्ये मैदानात खेळताना दिसणार नाही. पण तो आयपीएलमध्येच असेल. कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये नव्या रोलमध्ये दिसणार आहे. IPL 2023 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच असणार आहे.



IPL इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्डने आयपीएल मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad