उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड व मेडिकेअर मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे निगनुर येथे आयोजन करण्यात आले होते व या प्रसंगी विविध सामाजिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले होते .या वेळी भाविक भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लोकनेते श्री उत्तमरावजी इंगळे साहेब उपस्थित होते तसेच माजी सरपंच मुरलीधरजी राठोड माजी जि.प.सभापती दादारावजी गव्हाळे निंगणूर गावचे सरपंच सुरेशजी बरडे ढाणकी पत्रकार मैनोद्दिन सौदागर मारोती गव्हाळे गजानन नावडे सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंह शेखावत प्रमोद जयस्वाल नईम अली नवाब सुधिर तायडे बालाजी सकर्गे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णूभाऊ चौधरी उमरखेड तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे तालुका उपाध्यक्ष प्रमोदभाऊ राठोड विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष निकेशभाऊ राठोड तालुका उपाध्यक्ष नरेंद्रभाऊ अवधूत तालुका सचिव विजय अवधूत
महागाव तालुका अध्यक्ष शुभम राठोड महागाव तालुका उपाध्यक्ष शुभम वानखेडे शहराध्यक्ष आकाश भागवतकर विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष महागाव गणेश भागवतकर विद्यार्थी संघटना तालुका उपाध्यक्ष पियुष हरणे निंगणूर शाखा प्रमुख प्रकाश पारडे दिपक मेंडके गंगाधर बरडे सतिश मुडे सचिन पंडागळे गौरव राठोड अक्षय घोडे इत्यादींनी केले.