Type Here to Get Search Results !

सवणा गेट जवळील कोरड्याचा दक्षिण मुखी मारोती सर्व दूरपरिचित.|लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची भाविक भक्ताची मागणी.




सवणा गेट जवळील कोरड्याचा दक्षिण मुखी मारोती सर्व दूरपरिचित.|लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची भाविक भक्ताची मागणी.




हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे /- शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सवणा गेट जवळील नवसाला पावणारा दक्षिण मुखी मारोती हा हिमायतनगर तालुक्यासह पंचक्रोशीत प्रसिद्ध व नवसाला पावणारा कोरड्याचा मारोती म्हणून सर्व दूर परिचित होत आहे त्यामुळे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी शहरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते तेव्हा उपस्थित रामा रायभान कोरडे सह रामभाऊ सुर्यवंशी यांनी यावेळी बोलताना असे सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे लक्ष देऊन येथील मंदिराचा कायापालट करावा अशी मागणी उपस्थित भाविक भक्तांनी केली आहे.




याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सवणा गेट जवळील राळेत मागील काही वर्षापासून एक दक्षिणमुखी मारोती वसलेला आहे त्या मारोतीचा परिचय हिमायतनगर तालुक्या सह शहरातील नागरिकांना आहे त्यामुळे येथील भाविक भक्त असे सांगतात की हा मारोती नवसाला पावणारा मारोती म्हणून ओळखला जातो त्यामुळे दिनांक 13 नोव्हेंबर रोजी येथे येथील भाविक भक्तांनी येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते तेव्हा उपस्थित रामभाऊ सूर्यवंशी यांनी असे सांगितले की हा कोरड्याचा दक्षिण मुखी मारोती परिसरात परीचीत आहे त्यामुळे तो नवसाला पावणारा असल्याने या परिसरातील अनेक भाविक भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होत असतात त्यामुळे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील, हदगाव हिमायतनगर तालुक्याची लोकप्रिय आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मंदिराच्या कायापालटाकडे लक्ष देऊन येथे येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांच्या समस्या दूर कराव्या अशी मागणी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भावी भक्तांनी केली आहे




यावेळी उपस्थित रामभाऊ ठाकरे,विलास वानखेडे ,संतोष माने, रामभाऊ सूर्यवंशी,रामा रायभान कोरडे, योगेश चिल्कावार ,संदीप आप्पा तूप्तेवार, नाथा पाटील, मुन्ना शिंदे, बालाजी ढोणे, रामू आप्पा, पापा पार्डीकर,भाऊराव पाटील, गजानन हरडपकर , अवधूत गायकवाड,सह या परिसरातील असंख्य शेतकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad