Type Here to Get Search Results !

मुरबाड शिव तलावासाठी शेकडो नागरिकांचे नगरपंचयतला साकडे




मुरबाड शिव तलावासाठी शेकडो नागरिकांचे नगरपंचयतला साकडे


अन्यथा दखल न घेतल्यास नगरपंचायतीवर नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

मुरबाड दिनांक 12 प्रतिनिधी लक्ष्मण पवार  




:- मुरबाड नगरपंचयतीच्या पुरातन शास्त्री नगर तलावाचे कोट्यवधी रुपये खर्च करुन सुशोभीकरण केले असले तरी त्या तलावाचे शिव तलाव नामकरण करण्यात यावे.यासाठी शेकडो नागरिकांनी मुरबाड नगरपंचयतीला साकडे घातले असल्याने नगरपंचयतीने यांची दखल न घेतल्यास नगरपंचयत समोर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विशाल चवले, रामदास कराळे,अरुण कराळे, चंद्रकांत दुधाळे व शैलेश बोस्टे यांचेसह शेकडो नागरिकांनी दिला आहे.




          गेल्या पाच सहा वर्षांत मुरबाड नगरपंचयत चा सर्वांगीण झालेला विकास पाहता शहराला एक नवे रूप प्राप्त झाले आहे.त्या शहराची ओळख देत असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिल्याने सर्व नागरिकांनी नगरपंचयतीच्या निर्णयाचे स्वागत केले.या प्रवेशद्वाराला निरुपणकार नाना साहेब धर्माधिकारी नाव देऊन त्यांचे विचार मना मनात रुजविण्याचा प्रयत्न नगरपंचयत ने केला असताना या शहराचे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शस्री नगर तलावाचे देखील सुशोभीकरण करुन त्या तलावात भगवान शंकराच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून शहराचे सौंदर्यात मोठी भर पडली आहे.मात्र या तलावाचे नाना साहेब धर्माधिकारी नामकरण करण्याचा घाट नगरपंचयत ने घातला असल्याने होणाऱ्या वादामुळे धर्माधिकारी यांचे बद्दल असणारी अस्मिता कमी होणार आहे.त्यासाठी या तलावाचे भगवन शंकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावात साम्य असलेले शिव हे नाव देऊन.या तलावाचे शिव तलाव हे नामकरण करण्यात यावे.अन्यथा मुरबाड नगरपंचयत समोर हजारोंच्या संख्येने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिव प्रेमीनी मुरबाड नगरपंचयतला दिला आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad