Type Here to Get Search Results !

जव्हार आगारात एसटी बसच्या धडकेत भिंत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक मुलगा जखमी




जव्हार आगारात एसटी बसच्या धडकेत भिंत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक मुलगा जखमी झाला आहे.

जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर -
डहाणू -जव्हार गाडी जव्हार बस स्थानकात रात्री 8.30 च्या सुमारास पोहोचली . त्यातून प्रवासी उतरले आणि बाजूच्याच भिंतीपाशी बसले.परंतु,काही वेळातच चालू बसच्या धक्क्याने भिंत कोसळली आणि त्याखाली दोन मुले दाबली गेली. उपस्थित सुमारे 50 जणांनी भिंत उचलण्याचा प्रयत्न केला.मोठ्या प्रयत्नांनंतर पाच ते सात मिनिटानंतर ती भिंत उचलण्यात आली. त्याखाली दाबली गेलेल्या दहा ते बारा वर्षांच्या दोन मुलांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले.परंतु,त्यातील एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.तर एका मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व घटनेनंतर बसचालक फरार झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad