Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव साहेब यांनी कारगील नगर येथील श्रीम. गायत्री पोते यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री देवीचे दर्शन घेतले.





प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव साहेब यांनी कारगील नगर येथील श्रीम. गायत्री पोते यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री देवीचे दर्शन घेतले.

पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर 






प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव आणि प्रहारच्या इतर कार्यकर्ते/पदाधिकाऱ्यांनी काल वसई विरार शहराती नावाजलेल्या प्रसिद्ध नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री देवींचे दर्शन घेतले. 

त्यामध्ये संत नगर येथील श्री शारदीय दुर्गा पूजा उत्सव, कारगील नगर येथील महाकाली उत्सव, नालासोपारा येथील उत्तर भारतीय सामाजिक सेवा संस्था नवरात्री उत्सव, विरार पश्चिमेकडील शरोदीया दुर्गोत्सव, विजय नगर येथील शिवशंभो प्रतिष्ठान मित्र मंडळाचा नवरात्री उत्सव, नारिंगी फाटा येथील येसूबाई कंपाउंड नवरात्री उत्सव, नारिंगी रोड येथील कोकण नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ इत्यादी प्रमुख मंडळांना भेटी देऊन प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवदुर्गांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे कारगील नगर येथील श्रीम. गायत्री पोते यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री देवीचे सर्वांनी दर्शन घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad