Type Here to Get Search Results !

तेलंगणा येथील महिलांचा बतक्कमा सण भिवंडीत उत्साहात साजरा,मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग.




तेलंगणा येथील महिलांचा बतक्कमा सण भिवंडीत उत्साहात साजरा,मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग.

भिवंडी शहरामध्ये तेलंगणा,आंध्र प्रदेश येथील महिलांचा बतक्कमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मूळ तेलंगणा आंध्र प्रदेश येथील निवासी असलेला मुख्यत्वे विणकर समाज यंत्रमाग उद्योग नागरी मुळे भिवंडीत मोठ्या संख्येने स्थायिक झालेला आहे. या समाजातील महिलांनी बतक्कमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला .




        भिवंडी शहरात सायंकाळी बतक्कमा सण हा दक्षिण भारतातील तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यात नवरात्री काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .भिवंडी शहरात ही त्यांची संख्या अधिक असल्याने भिवंडी शहरात ही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 




नवरात्री मधील अष्टमीच्या दिवशी सायंकाळी उशिरा ताटात रंगीबेरंगी फुले सजवून अंगणात ठेवून त्या भोवती महिला,युवती फेर धरून पारंपारीक गाणी म्हणत नृत्य करीत आनंद साजरा करतात. व त्या नंतर उशिरा तलावात ही फुले विसर्जित करतात .




हा सण साजरा करण्यासाठी महिला साजशृंगार करून या उत्सवात सहभागी झाल्या हे विशेष.रात्री उशिरा पर्यंत विसर्जनासाठी वऱ्हाळ तलावाच्या विविध घाटां वर महिलांनी गर्दी केली होती. तर विविध सामाजिक संस्थांनी उत्कृष्ट बतक्कमा सजविलेल्या महिलांचा सन्मान करण्यासाठी विसर्जन घाटावर स्वागत कक्ष उभारले होते.स्वाभिमान सेवा संस्थे तर्फे 21 वर्षांपासून प्रसाद वितरण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad