मुरबाड दिनांक प्रतिनिधी लक्ष्मण पवार
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लोकोपयोगी सामाजिक कामांनी आपला वेगळाच ठसा उमटवणाऱ्या समता सामाजिक फाऊंडेशन या नामांकित संस्थेच्या ' मुरबाड च्या विकासाचे शिल्पकार' या विशेषांकाचे प्रकाशन बदलापूर येथे आमदार किसन कथोरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रकाशझोत टाकणारा ' विकासाचे शिल्पकार' हा विशेषांक समता सामाजिक फाऊंडेशन राज्याचे अध्यक्ष शंकर महादेव करडे यांनी प्रकाशित केला आहे.
या विशेषांकाचे प्रकाशन बदलापूर येथील आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आमदार किसन कथोरे, टीडीसी बॅंकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक राजेश पाटील, रिपाइं आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे .
मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव , जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, सुहास मोरे , सभापती स्वरा ताई चोधरी ,भास्कर वडवले , मोहन सासे, मुरबाड नगर पंचायत चे नगराध्यक्ष राम भाऊ दुधाळे, उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले , आणा साळवे ,सुजित ठाकरे, सुरेश बांगर , जाफर भाई शेख , रवि देसले , केलास देसले , , पत्रकार संजय बोरगे , लक्ष्मण पवार, दिलीप पवार , मंगल डोगरे व इतर मान्यवर उपस्थित होते