Type Here to Get Search Results !

सेलू | रिक्षा चालकाने कटरने चिरला सहकारी मित्राचा गळा | महावीर कॉम्प्लेक्स परिसरामधील घटना




सेलू - पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महावीर कॉम्पलेक्स या गजबजलेल्या परिसरात उधारीच्या पैशावरून दोन मित्रांमध्ये वाद , त्यात एका मित्राचा रिक्षाचालक असलेल्या दुसऱ्या मित्राने गाव कटरने वार करून गळा चिरला. गंभीर मित्राचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ही घटना रविवार २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सेलू शहरात उडाली.

पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत आरोपीला 15 मिनिटात ताब्यात घेतले. (संतोष किशनराव आपटे (वय ३५ वर्ष, रा. जैन मंदिर) असे मयताचे नाव असून. हेमंत गोविदराव गडले हा आरोपी असून वय (४० वर्ष, रा.समता नगर) हा आरोपी दोघेजण मित्र आहेत. आरोपी हेमंत गडले हा ॲटो रिक्षा चालक आहे. संतोष आवटे याच्या सोबत असलेल्या उसणवारी पैशाचा वाद टोकावर गेला. यात आरोपीने कटरने वार करून संतोष आपटे याला गंभीर जखमी केले उपचारासाठी सेतू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 पुढील उपचारासाठी त्याला परभणीला नेत असताना वाटेतच संतोष आपटे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसानी श्वान पथकाला पाचारण केले. पो. नि. रावसाहेब गाडेवाड यांच्या पथकाने आरोपी हेमंत घडले याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिवसाढवळया झालेल्या घटनेमुळे सेलू शहरात दहशतीचे वातावरण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad