Type Here to Get Search Results !

हिमायतनगर तालुक्यातील अनेक शिधाधारक 'आनंदाचाशिधा' च्या प्रतीक्षेत




हिमायतनगर तालुक्यातील अनेक शिधाधारक 'आनंदाचाशिधा' च्या प्रतीक्षेत.

 हिमायतनगर ता.प्रतिनिधी एम.यु हनवते सर्व भारतीयांचा आवडता सण म्हणजे दिवाळी होय.अगदी महिनाभरापासून या सणाची प्रत्येक जण जय्यत तयारी करीत असतो. आर्थिक उलाढाल सुद्धा याच सणात मोठ्या प्रमाणात होत असते.यंदा गोर गरिबांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून शासन दरबारी दिवाळी सनानिमित्य शासनाकडून नुकतीच राज्यातील शिधाधारकांना अगदी 100 शंभर रुपयात राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालया च्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत नियमित धान्या व्यतिरिक्त अगदी 100 शंभर रुपयात एक किलो,चनाडाल एक लिटर पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा देण्याची घोषणा केलीहोती ;पण दिवाळी हा सण येऊन ठेपला तरी अजून ही या किटचे जिल्हास्तर तालुका स्तरावरती वितरण करण्यात आलेले नाही.तरी वाढती महागाई लक्षात घेता लवकरात लवकर हा आनंदाचा शिधा वितरित करून हि दिवाळी गोड करावी अशी भावना अनेक शिधाधारकातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad