Type Here to Get Search Results !

पंढरपूरकरांची खड्ड्यातून मुक्तता करण्यासाठी मनसे सरसावली मनसे नेते दिलीप धोत्रे स्वखर्चातून काँक्रिट कामातून खड्डे बुजवतायत




पंढरपूरकरांची खड्ड्यातून मुक्तता करण्यासाठी मनसे सरसावली
मनसे नेते दिलीप धोत्रे स्वखर्चातून काँक्रिट कामातून खड्डे बुजवतायत




पंढरपूर - शहरातील अनेक रस्ते निकृष्ट असल्याने ते या अतिवृष्टीत खराब झाले असून याची दुरुस्ती नगरपरिषद करत नसल्याने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी शनिवारपासून स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.

यासाठी सिमेंट काँक्रेट मिक्सर मशीनचा वापर केला जात आहे.
पंढरपूर शहरात पावसामुळे सर्वच भागात प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना या खड्ड्यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी दोन महिला भक्तिमार्गाकडून येणाऱ्या ब्लड बँकेसमोरच्या रस्त्यावर खड्ड्यामध्ये पडून जखमी झाल्या आहेत.असे असताना ही व कार्तिकी यात्रा तोंडावर असताना नगरपालिकेला जाग येत नाही म्हणून आजपासून पंढरपूर शहरातील खड्डे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यावतीने सिमेंट काँक्रेट ने बुजविण्यास सुरुवात करण्यात आली .
दिवसभर पंढरपूर शहरात वाहतूक असल्यामुळे शहरातील सावरकर चौक, स्टेशन रोड ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा , नगरपालिका , डीवायएसपी ऑफिस समोर बोगदाजवळील मार्ग , सरगम चौक येथील सर्व खड्डे रात्री बुजवण्यात आले आहेत.

यावेळी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, नगरसेवक शिवाजी मस्के, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, मनसे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळणेरकर,अर्जुन जाधव, अवधूत गडकरी, सूरज देवकर उपस्थित होते.

91 इंण्डिया न्यूज चॅनेल साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News