Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी तिघांना अटक...हर्सूलला रवानगी




अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी तिघांना अटक...हर्सूलला रवानगी

आरोपी १)आकाश चव्हाण,सुरेश चव्हाण, शिवाजी पवार यांचे फोटो
सोयगाव, दि.२९..सोयगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सहा तास घरात डांबून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तिघांना बुधवारी रात्री सोयगाव पोलीस व पिंक पथक सिल्लोड यांच्या संयुक्त कारवाईत अटक करून गुरुवारी( दि.२९) औरंगाबाद येथील विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले असता त्या तिघांची हर्सूलला रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान नैराश्यातून विष्यप्राशन केलेल्या पित्याची गंभीर असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.
सोयगाव तालुक्यातील एका गावात गावालगत प्रातर्विधी साठी गेलेल्या अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून आकाश बंडु चव्हाण( वय २२)सुरेश विनोद चव्हाण (वय २१) शिवाजी इंद्ल पवार( वय२०) या तिघांनी तिला एका आरोपीच्या घरात पळवून घेऊन जाण्याच्या इराद्याने डांबून ठेवल्याची घटना उघड झाली होती याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम २०२२ अन्वये (८) व (१२) अंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी सिल्लोड येथील पिंक पथकाचे उपनिरीक्षक शरद वाघुळे, सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी बुधवारी दिवसभर पीडितेच्या गावात ठाण मांडून अधिक चौकशी अंती त्या तिघांना अटक करून गुरुवारी औरंगाबाद येथील विशेष पोक्सो न्यायालयासमोर हजर केले असता त्या तिघांची हर्सूल च्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
---पिता गंभीर--
दरम्यान मुलीच्या अपहार ची बातमी ऐकताच नैराश्य आलेल्या पीडितेच्या पित्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे..
याप्रकरणी पुढील तपास पिंक पथकाचे उपनिरीक्षक शरद वाघुळे,महिला पोलीस हवालदार वाकीकर, पोलीस नाईक टारपे, पोलीस शिपाई आहेर, शुभांगी भारती,सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक श्रीधर गीते,उपनिरीक्षक सतीश पंडित आदी करत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad