Type Here to Get Search Results !

भालेराव,मदने कुटुंबीयांचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले सात्वंन




भालेराव,मदने कुटुंबीयांचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले सात्वंन

अर्धापूर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पार्डी येथील भरधाव वेगात असलेला ट्रक घुसून गोल्डमेडलिस्ट कु.वर्षा माणीक मदने वय (२१) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला,तसेच लोणी येथील लक्ष्मण भालेराव यांचे शाॅक लागून निधन झाल्यामुळे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दोन्ही कुटुंबीयांना भेट देऊन कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन देऊन सात्वंन दि.२९ गुरूवारी रोजी केले आहे.

योगामध्ये राष्ट्रीय पातळीवरील पदक मिळवून ओरिसामध्ये गोल्डमेडल मिळविणारी नामांकित विद्यार्थीनी कु.वर्षा माणीक मदने हिचा सोमवारी राहत्या घरी दुचाकीला उडवून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ट्रकने माणीक मदने यांच्या घरात ट्रक शिरला यावेळी स्नानासाठी गेलेल्या कु.वर्षा मदने हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.तसेच लोणी येथील लक्ष्मण भालेराव यांचे शाॅक लागून निधन झाल्यामुळें खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भालेराव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लोणी येथील घरी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी माजी जि.प.रामराव भालेराव,आकाश भालेराव यांच्या कुटुंबीयांना धिर देत सांत्वन केले आहे. यावेळी जेष्ठ नेते धर्मराज देशमुख,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख,संचालक दत्ता पाटील पांगरीकर, 
भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले,गटनेते बाबुराव लंगडे,पत्रकार सखाराम क्षीरसागर, 
बाबुराव हेंद्रे,शहराध्यक्ष विलास साबळे,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे,सरचिटणीस तुळशीराम बंडाळे,आदित्य शिरफुले,
माजी सरपंच अशोक बुटले,सुधाकर कदम,चिटणीस अमोल कपाटे, 
संजय सोनटक्के,आनंद वैदे,बाळू किरकण,चन्नाप्पा दिग्रसे,
केरबा भुस्से,महेश भुस्से,कुश भांगे,आनंद वैदे,उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad