Type Here to Get Search Results !

तेलगांव (सीना)येथील विविध उपक्रमांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.





तेलगांव (सीना)येथील विविध उपक्रमांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा.




75 व्या स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून तेलगाव (सिना) येथे विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी विद्यामंदिर तेलगांव (सीना) येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 75 झाडांचे वृक्षारोपण करून आणि शालेय साहित्य देऊन आणि सामाजिक बांधिलकी जोपासली या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.शिंदे साहेब व डोणगांवचे केंद्रप्रमुख श्री.कोळी सर आणि 1996 - 97 च्या काळात ज्यांच्या अथक परिश्रमातून ही शाळा उभी राहिली त्या शाळेचे प्रथम शिक्षक श्री देवनपल्ली सर यांचाही यथोचित सत्कार विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आला .
शाळेच्या सर्वगुणसंपन्न मुख्याध्यापिका सौ. वसुंधरा शर्मा मॅडम यांचाही विशेष कौतुक करून सत्कार करण्यात आला.




या कार्यक्रमाला , ग्रामपंचायत सदस्य, गावातील युवक वर्ग सामाजिक संस्थेचे पदाधिकारी , शालेय व्यवस्थापन समिती
आजी - माजी सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad