Type Here to Get Search Results !

राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदार संतोष बांगर साहेब यांना सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा.




राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदार संतोष बांगर साहेब यांना सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेणारे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांना आज हिंगोली जिल्हा सरपंच संघटनेने जाहीर पाठिंबा दिला.

  यावेळी बोलताना सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनी म्हणाले की कळमनुरी मतदार संघ तसेच हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणीत धावून जाणारा नेतृत्व म्हणजे आमदार संतोष बांगर हे आहेत तसेच प्रत्येक गाव खेड्यात विकासाची गंगा खेचून आणणार नाव म्हणजे आमदार संतोष बांगर हे आहेत त्यामुळे आम्ही सरपंच संघटनेचे जास्तीत जास्त सदस्य आमदार संतोष बांगर साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यावेळी बोलताना इतर सन्माननीय सरपंच यांनी देखील आमदार संतोष बांगर साहेब यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांच्या विकास प्रिय व 24 तास जनतेची सेवा करण्याच्या कार्य शैलीने प्रभावित होऊन आम्ही सरपंच लोकांनी आमदार बांगर साहेब यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 
          यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, कयूम शेख, पंढरी नगर, राजू नागरे, राजू पाटील कराळे, नितीन होकर्णे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते 
तसेच यावेळी सुदमराव नागरे खेड,प्रकाश वाघमारे वारंगा मसाई,रमेश राऊत चिंचोर्डी, रुपेश सोनी गौळ बाजार(अध्यक्ष सरपंच संघटना),गणेश वरड बिबगव्हान, परमेश्वर वायकोळे पळोदी,नारायण कांबळे पार्डी, विजय बलखंडे जांबरून,तुकाराम नाईक पार्डी, गजानन हराळ हरवाडी, राजू मस्के मुंढळ, सोपान मस्के मोरगव्हान,बंडू पाटील बोरजा,मारोती पतंगे कोंढुर,दत्तराव इंगळे सिरसम,दत्तराव जाधव पळसोना,साहेबराव शिंदे असोंदा,बालू अंभोरे भूतनर सावंगी,गणेश पंचलिंगे पळोदी, पप्पू भाऊ अडकीने डोंगरकडा,भोजले मोरवाडी, प्रभाकर हाके पांगारा हाके,कैलास काशीदे बोरजा,पिंटू घुगे हिंगणी,बाजीराव घुगे बासंबा, प्रफुल्ल अप्पा कापसे येळी,सुधाकर राठोड लिंबी, पंढरी मारकड पातोंडा,सुभाष गडदे धनापुर, कपाटे भटसावंगी,संतोष डुकरे आमदरी,वंदना माहोरे जामगव्हान,कृष्णा शिंदे बाभळी,प्रवेश शृंगारे रेणापूर,राजू ठोके अँभेरी, प्रताप काळे लासीना,बाबुराव खंदारे बोथी,सुरेश राठोड चिंचोली,संजय घुगे भोगाव,बाळू कुटे माथा, कैलास पोले गोळेगाव,विलास मस्के वाई, ब्राम्हण वाडा दिगंबर चव्हाण,वामन कटके सुकापुर,गणेश गुटठे सालेगाव व इतर अनेक गावातील सरपंचांनी आमदार संतोष बांगर साहेब यांना यावेळी जाहीर पाठिंबा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad