Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे माजी खा.सुभाषराव वानखेडे यांचा २६ जुलै मंगळवार रोजी हिंगोली व कळमनुरी येथे भव्य सत्कार




शिवसेनेचे माजी खा.सुभाषराव वानखेडे यांचा २६ जुलै मंगळवार रोजी हिंगोली व कळमनुरी येथे भव्य सत्कार


          शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंञी मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाईट काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी आणि शिवसैनिकांना बळ देण्यासाठी माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचा दि.२६ जूलै २०२२ मंगळवार रोजी दु.१२ वा. शासकीय विश्रामगृह, हिंगोली आणि सकाळी १० वा. नवीन बस स्टँड,कळमनुरी येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
                यावेळी हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव,माजी मंञी डाँ.जयप्रकाश मुंदडा, डाँ.बी.डी.चव्हाण, जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, माजी उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड , परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भैय्या पाटील गोरेगांवकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
         तरी, हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख ,जिल्हा समन्वयक ,तालुकाप्रमुख , शहरप्रमुख ,सर्कलप्रमुख ,शाखाप्रमुख ,युवासेना , महिला आघाडी, शेतकरी सेना, अल्पसंख्यांक आघाडी ,दलित आघाडी पदाधिकारी , जि.प.,पं.स.,न.प. सदस्य,सरपंच व सर्व शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहसंपर्कप्रमुख डाँ.रमेश शिंदे ,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे ,सुनिल काळे,जी.डी.मुळे,डी.के.दुर्गे ,संदेश देशमुख ,जिल्हा समन्वयक दिलीप बांगर ,तालुकाप्रमुख अंकुश आहेर, सखाराम ऊबाळे ,आनंदराव जगताप ,भानुदास जाधव,संतोष देवकर ,राजूदादा चापके,शहरप्रमुख संतोष सारडा ,काशीनाथ भोसले ,जगनाथ देशमुख ,गोपू पाटील ,अँड.रवि शिंदे ,दिलीप घुगे ,युवासेना जिल्हाप्रमुख कैन्हय्या बाहेती,शिवा शिंदे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies