Type Here to Get Search Results !

बोरी शिकारी | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सौ रेखाताई देवकते यांच्या हस्ते साजरी

बोरी शिकारी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सौ रेखाताई देवकते यांच्या हस्ते साजरी करण्यात आली




   कळमनुरी विधानसभेतील बोरी शिकारी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मारुती मंदिरापासून अहिल्याबाई होळकर प्रतिमेचे शिवसेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ रेखाताई देवकते यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली व गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून पुन्हा मारुती मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,तरुण,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते


 सौ रेखाताई देवकते यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शना मध्ये धनगर समाजाने एकजुटीची ताकद दाखवून द्यावी गावागावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करावी व जर धनगर समाज संघटीत झाला तर महाराष्ट्रावर राज्य करणारा समाज म्हणुन धनगर समाजाकडे पाहतील हा या जयंतीनिमित्त इथे शब्द देते व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंती च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad