भाजपाच्या पाठिंब्याने विधान परिषदेचा अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत याचां उमेदवारी अर्ज दाखल
विधान परिषद निवडणूक करिता पाठींबा दिल्याबद्दल पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री मा. श्री. अमित शाह साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. जे पी नड्डा साहेब, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांचा मी ऋणी आहे.
- सदाभाऊ खोत
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील साहेब, खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आमदार कुचे साहेब, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, महिला प्रदेशाध्यक्ष निता खोत, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, राज्य प्रवक्ते सुहास पाटील, भानुदास शिंदे, तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.