Type Here to Get Search Results !

फलटणकरांची मने जिंकली साहेब तुम्ही - प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

फलटणकरांची मने जिंकली साहेब तुम्ही





आदरणीय श्री. सुभाषजी देसाई साहेब, तुम्ही ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत. तुमचा निष्ठावान व कट्टर शिवसैनिक म्हणून कायम अभिमान आहे आणि राहील. वय झालं की कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पक्षातील इतर नवतरुण इच्छुकांना जागा मोकळी करुन दिली पाहिजे.


या गोष्टीचा कुठेही संकुचितपणा न दाखवता आपण केलेला स्वीकार खरंच अभिमानास्पद आहे. "मी, माझं आणि मला" या सर्वांचा त्याग करुन आपण दाखवलेला मनाचा मोठेपणा, खरंच जिंकलं साहेब तुम्ही महाराष्ट्रातील व फलटण तालुक्यातील जनतेला व शिवसैनिकांना. आपला अनुभव व मार्गदर्शन पुढील काळात शिवसैनिकांसाठी कायमच महत्वपूर्ण व फायदेशीर ठरणार आहे यात काही शंका नाही.


खरे आदर्श उदाहरण विधानपरिदषद निवडणुकीच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील नेत्यांना व जनतेला दाखवुन दिले आहे. तुमचा यथोचित आदर व सन्मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे नक्कीच अबाधित ठेवतील यात काही शंका नाही.

प्रदिप हरिभाऊ झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad