Type Here to Get Search Results !

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी , पुण्यातील ' या ' मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

• Gyanvapi Mosque : ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे .



Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात ( District Court ) सुनावणी होणार आहे . या पूर्ण प्रकरणावर नव्यानं सुनावणी केली जाणार आहे . जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे . सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयाकडे सोपवली आहे . या प्रकरणी 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर आज सुनावणी होणार आहे . तसेच , काशी विश्वनाथ मंदिराचे महंत डॉ . कुलपति तिवारी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याबाबत वाराणसी कोर्टात याचिका करणार आहेत . 

पुण्यातील ' या ' मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा 

ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे . काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदीरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत , या दर्ग्याच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल , असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलंय . 

सुप्रीम कोर्टाचे आदेश 

दरम्यान , ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाऐवजी जिल्हा कोर्टाकडे होणार आहे , असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे . जिल्हा न्यायाधीश ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी करणार आहेत . जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे . ज्ञानवापी प्रकरणाची ( शुक्रवारी ) कोर्टात तिसऱ्यांदा सुनावणी झाली . न्यायमूर्ती वी आय चंद्रचूड , न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली .

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण अहवालात काय ? 

ज्ञानवापी मशिदी प्रकरणाच्या सर्वेक्षण अहवालानुसार , उत्तर ते पश्चिमच्या बाजूने चालत गेल्यास मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून आली . त्याशिवाय या ठिकाणी दिसून आलेल्या अवशेषांनुसार एखाद्या मोठ्या भवनाचे अवशेष असल्याचं दिसून आलं असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे . दरम्यान , ज्ञानवापी मशिद प्रकरणातील एक वकील आजारी असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी सुनावणी पुढे ढकलली . तसेच , हिंदू याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलानं सांगितलं वाराणसी कोर्ट 23 मे रोजी या प्रकरणावरील सुनावणी की , सुरू ठेवणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News