उमरखेड दि . २४ ( प्रती )
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक 29 मे 202 2 रोजी शिवकमल मंगल कार्यालय ( फार्मसी कॉलेज जवळ ) , तिवडी रोड उमरखेड, येथे आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा सकाळी १० वाजता पासून सुरू होणार आहे या कार्यक्रमास जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
पश्चिम विदर्भ उपपीठ प्रमुख कुंडलीक वायभासे मा . सुरेश मोरे मा ,. मा . देवेंद्र दलाल यांचे वतीने करण्यात आले आहे या पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे ज .न म . संस्थानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत, मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत अँबुलन्स, व वेळोवेळी रक्तदान शिबिरे, तसेच ब्लड निड अंतर्गत नगरजूंना, तात्काळ रक्तपुरवठा, दुष्काळग्रस्त मदत, अतिवृष्टी मदत, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई मशीन वाटप, अन्नछत्र ,आर्थिक दुर्बल घटक पुनर्वसन असे अनेक सामाजिक उपक्रम या संस्थांच्या वतीने राबविले जातात तसेच संस्थांनच्या वतीने शेतीविषयक उपक्रमा अंतर्गत गरजू शेतकरी बांधवांना मोफत फवारणी पंपाचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे ,
या कार्यक्रमात जगद्गुरु श्रींच्या पादुका चे पूजन, आरती सोहळा , प्रवचन सोहळा, भक्त दीक्षा, पुष्पवृष्टी अशा मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पश्चिम विदर्भ पिठ प्रमुख, व्यवस्थापन समिती, जिल्हा निरीक्षक अशोक गोंदाने, जिल्हा अध्यक्ष वामन मोटे,संजीवनी प्रमुख अमोल कोथळकर, तालुका अध्यक्ष गजानन गरवारे ,विषाल पहुरकर, विठ्ठल टोमके ,प्रशांत हिंगाडे, प्रसिद्धीप्रमुख राजेश गांजेगावकर ,अनिल कदम ,जिल्हा कर्नल बापूराव खंदारकर यांचे वतीने करण्यात आले आहे