Type Here to Get Search Results !

मुल | शेती शिवारात मेंढापाळावर बिबट्याचा हल्ला, मेंढपाळ गंभीर जखमी

शेती शिवारात मेंढापाळावर बिबट्याचा हल्ला, मेंढपाळ गंभीर जखमी





चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील शेती शिवारात मेंढ्याची लाँग घेऊन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या विलास अल्लीवार या मेंढपाळांवर बिबट्यांनी हल्ला केला, यात तो गंभीर जखमी झाला आहे. बिबट्याने त्याच्या मानेवर गंभीर इजा केली आहे.


जखमी मेंढपाळाला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणन्यात आले.इथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता मेंढपाळ विलास अल्लिवार याला रात्रौ चंद्रपूर येथे जील्हारुग्नालयात पाठविण्यात आले.
कालच मूल लगतच्या सरडपार येथील एका झोपलेल्या इसमावर बिबट्यांनी हल्ला करून त्याला ठार मारले, तर दुसर्‍या घटनेत मोहफुले वेचणाऱ्या पवनपार येथील इसमाला वाघाने ठार मारले.


वन्य प्राण्याच्या सततच्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागातील जनता दहशतीत आली आहे.

सध्या ग्रामीण भागात मोहफुल गोळा करण्याची सिजन सुरू असल्याने मोठ्या संख्येने लोक अगदी सकाळीच जंगलात मोहाफुल गोळा करण्यासाठी जंगलात जातात.काही लोकांचे यावर उदरनिर्वाह होते.मात्र सध्या नेहमी होत असलेल्या वन्य प्राण्यांच्या हल्यात मानवी जीवित हानी यामुळे जनता भयभीत झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं काळाची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad