Type Here to Get Search Results !

चामोर्श - मारकंडा देव,ते शंकरपूर टि-पाईंट रस्त्याचे काम सुरू

चामोर्श - मारकंडा देव,ते शंकरपूर टि-पाईंट रस्त्याचे काम सुरू



‘युवा संकल्प' संस्थेच्या प्रयत्नांना यश


चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडेश्वर मदिरस्थळी जाणाऱ्या मार्कंडा देव ते चामोर्शी रस्त्याची वाट बिकट झाली होती. त्याची दखल घेत युवा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाने मागणीची दखल घेत रस्ता बांधकामाला नुकतीच सुरुवात केली आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.



समाजहिताच्या प्रश्नांना प्रशासनासमोर मांडण्याचे कार्य युवा संकल्प संस्था ग्रुप नेहमीच करत असते. 9 फेब्रुवारीला पीडब्ल्यूडी कार्यालय चामोर्शी यांना निवेदनातून मार्कंडा मोहल्ला, ते विदर्भाची काशी मार्कंडादेव, मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे.

त्यामुळे या रस्त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची घेऊन दखल मार्कंडादेव टी-पाईंट ते विदर्भाची काशीपर्यंत अगदी 11 दिवसात कामाला सरुवात करण्यात आले. निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन कामास सुरुवात केल्याबद्दल युवा संकल्प ग्रुपकडून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोडची पाहणी करताना युवा संकल्प ग्रुप चामोर्शीचे तालुका प्रमुख, सुरज नैताम, उपप्रमुख प्रशांत चुदरी, डॉ. विशाल सहारे, सुरज चौके, राहूल चिचघरे, अजय भाडेकर, लटारे, विक्की बारसागडे, विजय भांडेकर सुनील चलाख, सुरज भाकरे, ध्रुप चिचघरे, अनुराग बन्सोड, अनुराग नवले व ग्रुपचे सदस्य उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad