Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हत्येचा थरार..! पैलवानाची हत्या; भीषण गोळीबाराचा Live Video

 पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हत्येचा थरार..! पैलवानाची हत्या; भीषण गोळीबाराचा Live Video

 पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे.
10 दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे.
 शेलपिंपळगाव गावच्या भर चौकात ही निघृण हत्या केली. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दबा धरुन बसलेल्या चार अज्ञात तरुणांनी गाडीवर गोळीबार करत हत्या केली आहे. गुरुवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे.
 नागेश कराळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.
दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या चार गोळ्या झाडल्यात. घटनेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोळीबारात हत्या झालेल्या तरुणाची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.
दरम्यान आताच आलेल्या ताज्या अपडेटनुसार, खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील तरुणाच्या हत्येनंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसंच जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad