Type Here to Get Search Results !

मुख्य अभियंता,बारामती परीमंडल यांच्या कडून एक गाव एक दिवस अभियान, गावातील कामे केली जातील

सरडे गावातील सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन एक गाव एक दिवस फलटण विभाग

शनिवार दि.२५ डिसेंबर२०२१ रोजी मा. मुख्य अभियंता, बारामती परीमंडल, यांच्या *एक गाव एक दिवस* संकल्पनेतून, राजाळे शाखे अंतर्गत सरडे या गावात एक दिवस एक गाव ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने मध्ये सहभाग घेत राजाळे शाखा कार्यालयातील सर्व जनमित्र व मेंटेनन्स ठेकेदार यांच्या मार्फत संपुर्ण एक दिवस गावातील मेंटेनन्स ची कामे केली जातील या एका दिवसात लूज गाळे ओढणे, फ्यूज बदलणे,नवीन पोल टाकणे, स्पेसर टाकने, तसेच ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण करणे इत्यादि कामे करण्यात येणार आहेत. सकाळी 10:00 वाजता
 उपकार्यकारी अभियंता फलटण ग्रामीण हे कृषी योजना 2020 सर्व ग्रामस्थांना समजावून सांगतील व नारळ फोडून कामास सुरुवात होईल त्यानंतर ज्या ग्राहकांच्या बिलाच्या तक्रारी असतील त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल, ज्या ग्राहकांना नवीन कनेक्शन हवे आहेत त्यांचे अर्ज स्वीकारले जातील सर्व सरडे गावातील ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा . स्थळ महालक्ष्मी मंदिर सरडे गावठाण

      फलटण(ग्रा) उपविभाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad