पालघर :सौरभ कामडी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निर्माती मिळताती दांडवळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल ब्रिज परिसरात नदी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पोलीस कर्मचारी गुरुनाथ आहेर यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८.३० वाजता सुरू झालेल्या या अभियानात सुमारे ४० ते ५० युवा मित्र-मैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने युवतींनीही सहभाग नोंदवत नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुनाथ आहेर यांना त्यांचे सहकारी हॉटेल कणसरीचे मालक जयतम वाघ वाघ, जयराम ठाकरे दिनेश साबळे, गंगाधर वारघडे तसेच युवती प्रतिनिधी चंद्रकला ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व युवक-युवतींनी एकजुटीने काम करत नदी परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मेहनत घेतली.
सुमारे दीड तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेनंतर सर्व सहभागींसाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी गुरुनाथ आहेर यांनी युवक-युवतींना पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. युवा शक्तीने एकत्र येऊन समाजोपयोगी कार्यात सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण झाली असून सहभागी युवक-युवतींचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
