Type Here to Get Search Results !

घोडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे आज मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .


 यावेळी घोडेगाव नगरीचे विद्यमान उपसरपंच श्री . कपिलभाऊ सोमवंशी , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .हेमंतभाऊ काळे , मुख्याध्यापक श्रीमती अलका चासकर शिक्षक वृंद श्री .राजाराम काथेर ,सौ. सुनीता घोडे , सौ. ललिता तुरे सौ .नंदा केंगले सौ .रोहिणी घोडेकर सौ .निलम सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .यावेळी उपसरपंच कपिल सोमवंशी यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली . 


श्री. हेमंतभाऊंनी ग्रंथ दिंडीचे पूजन केले .यावेळी कुमार तन्मय घोडे या विद्यार्थ्याने मराठी भाषेचे महत्व सांगितले .श्री कपिल सोमवंशी याची उपसरपंच घोडेगाव निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष हेमंत काळे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथ दिंडी ची मिरवणूक वाजत गाजत काढली .


शाळेच्या सर्व विद्यार्थिनी यावेळी पारंपारिक वेशभूषेत व विद्यार्थी फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते.


प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad