Type Here to Get Search Results !

बावडा जि.प.प्रा. शाळेत प्रजासत्ताक दिन संपन्न.


 दि. 26 जानेवारी 2024 रोजी जि.प.प्रा.शाळा बावडा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन आयोजित करण्यात आला . 
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मा.सौ पल्लवी रणजीत गिरमे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमात राष्ट्रगीत, ध्वजगीत व संविधान प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली .विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास गावचे सरपंच मा.सौ पल्लवी रणजीत गिरमे, उपसरपंच मा .रणजीत घोगरे, ग्रामसेवक मा.सौ अंबिका पावसे मॅडम , सदस्य व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक), प्रा .एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी )यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी या कार्यक्रमात उत्सफूर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना खाऊ व शालोपयोगी साहित्य वाटप केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad