Type Here to Get Search Results !

जांबुड येथे आपला संकल्प विकसित भारत यात्रेचे स्वागत !



 प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड 


मोदी सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांचे लाभ गावागावातील ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभर विकसित भारत संकल्प यात्रा सुरु आहे. आज जांबुड ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथे 'विकसित भारत संकल्प यात्रा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रा.सुमित भोसले सर यांनी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिली , आरोग्यवर्धिनी उपकेंद्र जांभुड यांच्यामार्फत आयुष्यमान गोल्डन कार्ड चा कॅम्प घेण्यात आला.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल नाईकनवरे, आरोग्यसेवक श्री.हरून शेख आरोग्यसेविका श्रीमती. निता सावंत , यांनी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आणि आभा कार्ड काढून दिले यावेळी उपसरपंच श्री.सुहास यादव ग्रामसेवक जाधव साहेब ,नितीन गुळूमकर सर्व आशा सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad