Type Here to Get Search Results !

करोळे | सरपंचपदी पोपट सत्यवान बंडगर यांची निवड



पंढरपूर तालुक्यातील करोळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पोपट बंडगर यांचे बिनविरोध निवड करण्यात आली.




करोळे ग्राम पंचायतीच्या सरपंच मारुती रोडगे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.

त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत करोळे येथे कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.




यावेळी सरपंच पदासाठी पोपट बंडगर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोपट बंडगर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच पोपट बंडगर यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad