कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याला अपघात
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याला अपघात झाला.
कोल्हापुरात झालेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर सावंत हे जोतिबाला दर्शनासाठी जात होते.
यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला.