Type Here to Get Search Results !

आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना सहा महिन्यांची शिक्षा



नवी दिल्ली: फसवणूकप्रकरणी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात सुमारे साडेसात कोटी रुपये ३० दिवसांच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेशही दिल्लीतील न्यायालयाने दिले आहेत. साकेत सैनिक फुडस् प्रा. लि. यांनी इंडियन शुगर, रणजितसिंह बबनराव शिंदे आणि रणजित शरद बोरावके यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
२०१७ सालचे हे प्रकरण असून, सहा वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. गेल्या सात वर्षांपासून त्यांची देणी थकविली असल्याचा फिर्यादीचा आरोप होता. आपली रक्कम परत मिळावी आणि वादीस शिक्षा व्हावी असे फिर्यादीच्या वकिलांनी म्हटले होते.
न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून रणजितसिंह शिंदे आणि रणजित बोरावके यांना सहा महिन्यांच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली. त्याशिवाय साडेसात कोटींची रक्कम ३० दिवसांत देण्याचे आदेशही दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad