Type Here to Get Search Results !

माढा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी 54 कोटी निधी मंजूर -आ.बबनदादा शिंदे



माढा विधानसभा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या कामासाठी डिसेंबर,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 54 कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामध्ये माढा तालुक्यातील 20 रस्त्यांचा, पंढरपूर तालुक्यातील 10 व माळशिरस तालुक्यातील 3 अशा एकुण 33 रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करणेसाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ना.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचेकडे रस्त्यांच्या कामांना निधी मिळणेबाबत मागणी केली होती. त्यानुसार माढा विधानसभा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध रस्त्यांचे कामासाठी डिसेंबर,2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 54 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या कामांमुळे माढा मतदारसंघात दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.


अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेले रस्ते व निधी

माढा तालुका-

1) दारफळ ते भुईंजे रस्ता - रु. 2 कोटी, 2) खैराव ते बुद्रुकवाडी रस्ता- रु. 2 कोटी, 3) टेंभुर्णी-बेंबळे रस्ता ते मिटकलवाडी (माळेगांव) रस्ता - रु. 2 कोटी, 4) सोलंकरवाडी ते नॅशनल हायवे-9 रस्ता - रु. 2 कोटी, 5) टेंभुर्णी ते कन्हेरगांव रस्ता- रु. 1 कोटी, 6) दहिवली-निमगांव-पिंपळनेर-उजनी-व्होळे-भेंड-अरण-तुळशी-रस्ता (भाग- पिंपळनेर स्टॅन्ड पासून)- रु.1.50 कोटी, 7) शिराळ (मा) ते उजनी (मा) रस्ता-रु. 1 कोटी, 8) चिंचोली ते सापटणे रस्ता-रु. 60 लाख, 9) प्रजिमा-128 ते वडोली-नगोर्ली-शिराळ (टें)-सुर्ली-अकोले (खु) रस्ता (भाग-नगोर्ली ते रा.मा.-9)-रु.1 कोटी, 10) माढा ते वैराग रस्ता (भाग- रेल्वे क्रॉसिंग ते दारफळ फाटा)- रु. 2 कोटी, 11) टेंभुर्णी-बेंबळे-परिते-वरवडे-व्होळे-भेंड-पडसाळी-चिंचोली-माढा रस्ता (भाग- भेंड-पडसाळी-चिंचोली) - रु. 2.50 कोटी, 12) केवड ते अंजनगांव (उ) रस्ता - रु. 1.50 कोटी, 13) उपळाई (खु) ते उंदरगांव रस्ता- रु. 1 कोटी, 14) परीते ते घोटी रस्ता- रु. 1 कोटी, 15) प्रजिमा-128 ते ओंकारेश्वर मंदिर रांझणी रस्ता - रु. 1 कोटी. 16) दहिवली-निमगांव-पिंपळनेर-उजनी-व्होळे-भेंड-अरण-तुळशी-रस्ता - रु. 2.50 कोटी. 17) बार्शी-मालवंडी-मानेगांव-नरखेड-भोयरे रस्ता- रु.4.60 कोटी, 18) दारफळ ते उंदरगांव रस्ता- रु. 50 लाख,19) चिंकहिल-तडवळे-वडशिंगे ते दारफळ रस्ता- रु. 3 कोटी, 20) जाधववाडी ते इजिमा-141 रस्ता- रु. 1 कोटी,


पंढरपूर तालुका-

1) करोळे ते कान्हापूरी रस्ता-रु. 3 कोटी, 2) रोपळे-खरातवाडी-जाधववाडी रस्ता-रु. 1 कोटी, 3) खेडभोसे-पवारवस्ती रस्ता-रु. 70 लाख, 4) पिंपळनेर-सापटणे-वेणेगांव-बेंबळे-कान्हापूरी-उंबरे-करोळे रस्ता-रु 1.50 कोटी, 5) रोपळे-तुंगत-सुस्ते रस्ता-रु 1.20 कोटी, 6) प्ररामा-8 ते भोसे-खेडभोसे ते खेडभाळवणी-गादेगांव रस्ता (भाग-भोसे-गावडेमळा ते सुगांव खेडभोसे)- रु 1 कोटी, 7) प्ररामा-8 ते खेडभोसे-देवडे-पटकुरोली-आवे-नांदोरे रस्ता (भाग-आवे ते नांदोरे)- रु 2.50 कोटी, 8) अजनसोंड ते रा.मा.390 रस्ता- रु. 1 कोटी, 9) गुरसाळे-बाभुळगांव-नारायण चिंचोली-इश्वर वठार रस्ता (भाग-ना.चिंचोली ते बाभूळगांव)- रु. 1 कोटी, 10) खेडभोसे-पवारवस्ती-खळगेवस्ती ते शेवते रस्ता- रु.1 कोटी,


माळशिरस तालुका-

1) उंबरे (वेळापूर) ते श्रीपूर प्रजिमा-118 ला मिळणारा रस्ता (भाग-उंबरे (वे) ते श्रीपूर) - रु. 3 कोटी, 2) रा.मा.145 ते महाळुंग श्रीपूर 15 सेक्शन ते नेवरे (भाग - श्रीपूर ते 15 सेक्शन ते नेवरे)- रु. 2 कोटी. 3) वाफेगांव ते बेंबळे रस्ता-रु. 1 कोटी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad