Type Here to Get Search Results !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आशीर्वादाने फुटपाथवर अनधिकृत स्टॉल व दुकानदाराचा कब्जा



कल्याण (भानुदास गायकवाड)


             कल्याण पूर्व कोळसेवाडी ते काटेमानिवली रस्त्यावरील फूटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांचा व दुकादारांकडून कब्जा करण्यात आला आहे ,त्यामुळे रस्ता छोटा असल्याकारणाने नागरिकांना ,फूटपाथ वरून न जाता रस्त्यावरून जावे लागत आहे ,यामुळे एखाद्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, फूटपाथ वर ठेवलेले पुतळे, साहित्य त्यामुळे पूर्ण फूटपाथ व्यापून जातो व त्यात एखाद्या नागरिकाने त्याविरोधात आवाज उठवला असता त्यांच्यावर दुकानदारांकडून दमदाटी केली जाते यामुळे एथील नागरिक हैराण झाले आहेत ,बातमी लावली असता थातूरमातूर पद्धतीने कारवाई केली जाते ,पुन्हा तीच परिस्तिथी बघायला मिळते , हा त्रास केव्हा कमी होईल असा प्रश्न नागरिकांकडून विचारलं जात आहे , आयुक्त साहेब यावर काही कारवाईचे आदेश देणार की दुर्लक्ष करणार हा पाहण्याचा विषय आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies