सेठ अगर चंद कुंकू ळोड प्रशाला बार्शी येथे एसएससी बॅच सन 1993 - 94 यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी श्री एडवोकेट अक्कळकोटे यांनी खूप परिश्रम घेतले यावेळी तीस वर्षांपूर्वी यांना शिकवत असलेले सर गुरुवर्य श्री विश्वनाथ कोरके सर नरके सर कुंभोज मॅडम घोगरे मॅडम यांनी आपली हजेरी लावली.
यावेळी शाळेची बेल वाजवून सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला तसेच शाळेत प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी सासरी गेलेल्या महिलांनीही शाळेत आपली हजेरी लावली तीस वर्षा पूर्वी इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला वर्ग एकत्र आल्यामुळे शिक्षकांचे मन भारावून गेले दुपारच्या सुट्टीत जेवणाचा आस्वाद घेऊन कोरके सरांच्या मनोगत आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला