Type Here to Get Search Results !

चांदवड | मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच



चांदवड : येथील गणूर चौफुलीवरील विश्रामगृहाबाहेर गुरुवार (दि. २६) पासून मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेले साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच असून आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे चांदवड तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास प्रारंभ केला असून, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. उपोषणात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल तसेच सर्व क्षेत्रातील मराठा बांधव उपस्थित होते .त्यामध्ये वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह.भ.प.महेश महाराज काटे ,अ.भा. युवक मराठा उपाध्यक्ष व अ.भा.मडंळ चांदवड तालुका सचिव युवाकिर्तनकार ह.भ.प.दिपक महाराज कोतवाल ,अ.भा. मडंळ नाशिक जिल्हाध्यक्ष ह.भ.प.अशोक म.गांगुडै व चांदवड तालुक्यातील बहुसंख्य वारकरी -भजनी मडंळी उपस्थित होते. सर्व राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शेतकरी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती चांदवड येथील युवाकिर्तनकार ह.भ.प.भुषण कोतवाल यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad