Type Here to Get Search Results !

हॅप्पी स्कूल प्रोजेक्टसाठी आंबेगाव वसाहत प्राथमिक शाळेची निवड.



घोडेगाव , दिनांक 26/ 9/ 2023

इनरव्हील क्लब ऑफ मंचर च्या वतीने हॅपी स्कूल प्रोजेक्ट म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत शाळेची निवड आंबेगाव तालुक्यातून करण्यात आली.

हॅपी स्कूल प्रोजेक्टचे उद्घाटन इनरव्हील क्लब ऑफ मंचरच्या चेअरमन डॉक्टर मेघा गाडे यांनी केले याप्रसंगी डायटच्या अधिव्याख्याता राजश्री तिटकारे इनरव्हील क्लबच्या सदस्य डॉक्टर शिवमाला धायबर , डॉक्टर सुवर्णा काळे , दिपा पाटील , माजी सभापती प्रकाशराव घोलप , सरपंच प्रमिला घोलप , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा भाग्यश्री जगदाळे , केंद्रप्रमुख अशोक पारधी , उपसरपंच परवीन पानसरे ,ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप ,मिलिंद भांगरे ,अनिता विरणक , पूनम घोलप व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .




विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शर्मिला कोकणे यांनी हॅप्पी स्कूल अंतर्गत नवीन शालेय इमारतीमध्ये विविध भौतिक सुविधांच्या उणिवा असल्याचे इनरव्हील क्लबच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे इनरव्हील क्लबच्या वतीने सुमारे १.५ लक्ष रुपयाचे वॉटर प्युरिफायर , हॅन्ड वॉश स्टेशन ,ग्रंथालय कपाट , बेंचेस, स्पोर्ट ड्रेस इत्यादी साहित्य हॅपी स्कूल उपक्रमांतर्गत विद्यालयाला देण्यात आले . डायटच्या अधिव्याख्याता राजश्री तिटकारे यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे व शाळेच्या गुणवत्तेचे आवर्जून कौतुक केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर मेघा गाडे यांनी हॅपी स्कूल प्रोजेक्ट म्हणून क्लबच्या वतीने वर्षभर आवश्यक सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा व गुणवत्ता वाढीसाठी योगदान देणार असल्याचे सांगितले.

 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जयश्री मिडगे ,मीनाक्षी रायबोले , पुनम डोके, गणपत डोके यांनी केले .सूत्रसंचालन मीनाक्षी रायबोले व आभार जयश्री मिडगे यांनी मानले .


प्रतिनिधी - आकाश भालेराव 

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad